Saturday, April 27, 2019

एका पुंडलिकाची दुसरी गोष्ट

" कल, आज और कल"
सिनेमा छान आहे हे मला आता ह्या साठी सांगावं वाटतंय कारण काही प्रश्न आणि त्यांची उत्तर सुचत आहे.
खरं तर सारखे प्रश्न पडणाऱ्या माणसाला उत्तरं ही सुचतात हा एक वेगळाच विनोद आहे.

पुंडलिकाला विठ्ठलानं लाथाडावं असं विपरीत घडतं का ?
हे तर स्वतःला पुंडलिक मानणारा आणि तो कुणाला पांडुरंग मानतो ह्यावर अवलंबून आहे.
(ह्या बद्दल दोन्ही पक्ष्याची लायकी काय ? हा निर्णय घ्यायला कोणी तिसरा हवा आहे का ?)

 एकदा स्पस्ट बोलणाऱ्या बापानं बोलून दाखवलं " आम्हाला काही फरक पडत नाही,  आमच्या मुलाकडून काही अपेक्षा नाही." मग मुलगा विचार करू लागला आपल्याला वडिलांना मुखाग्नी देण्याचा तरी हक्क मिळेल का ? आईवडिलांची सेवा करण्याचा मोह ज्याने जन्मभर पाळला त्याने ह्या टोकाचा विचार करावा?  का?
नवस बोलून झाल्येल्या मुलाबद्दल, स्वतः चांगले संस्कार करून वाढवलेल्या मुलाबद्दल बापाने हे बोलावं?  का ?

गोष्ट रामाची की दुर्योधनाची ? जमदग्नीची की  शाहजहाँची ? गोष्ट एकविसाव्या शतकातली की पिढ्यान पिढ्यांची?
 काळ, स्थान आणि व्यक्ती निश्चित झाले की गोष्टीला हवा तसा आकार देता येतो हे प्रत्येक वाचकाला माहिती असतंच.

समीकरण स्पष्ट आहेत.  १) ह्या बदलत्या युगात मुलं आईवडिलांकडे दुर्लक्ष करतातच.
२) ज्या मुलांकडून अपेक्षा नाही तो कर्तव्य पार पाडण्यात कमी पडला थोडक्यात आपली लायकी सिद्ध करू  शकला नाही.
३) एका शब्दात - प्रारब्ध ( प्रत्येकाचं )

मग वेगवेगळ्या दृष्टीकोनाने वडील आणि मुलगा बिन काचेच्या चष्म्यातून एकमेकांकडे बघू लागले.
दुर्दैव हें उत्तरं दोघांकडेही राखून ठेवलं होतच. काच नसली तरी विचारांची फ्रेम असतेच, नाही का?

मुलाने वारंवार विचार केला आपण कुठे चुकलो?
वडिलांनी जाहीर केल, परत परत " आम्हाला काही फरक पडत नाही, आमच्या मुलाकडून काही अपेक्षा नाही."
मुलगा विचार करू लागला आपल्या ह्या भिकार कथेचा आणि कृष्णाच्या मृत्यूच्या कथेत साम्य शोधता येईल का?
वडिलांनी बहुदा औरंगजेबाची प्रतिमा उभी केली असावी.
स्वतः श्रीकृष्णाला गांधारीच्या शापाचा तोडगा काढता आला नाही की ते तसच घडावं हे त्याने ठरवलं होतं ?

आपल्या कथेत " हे असच होणार"  हे आधीच कुणी ठरवून ठेवलं आहे का ?
परत दोघांनी विचार केला,  आपली विवंचना आपण कशी मांडावी ? हे जे शिक्के-ठसे आपल्या कपाळावर उमटवले हे कसे दूर करावे.
प्रार्थना करून,  द्यावया करून?  आकांत तांडव करून की आत्महत्या करून हा पहिला विचार.
आपण स्वतःच दूर व्हायचं आणि समोरच्याची वाक्य खरी होण्यास मद्त करावी हा दुसरा विचार.
( "तू म्हणतो तसंच घडो असं वास्तुदेवता म्हणत असतो" हे आजीने सांगितलेला आठवलं )

परत ते वाक्य खोली भर पसरलं  " आम्हाला काही फरक पडत नाही, आमच्या मुलाकडून काही अपेक्षा नाही."
त्या वाक्याचं प्रतिउत्तरही  मागो माग फिरत होतं - मग ज्याने फरक पडत नाही किंवा ज्याच्या कडून अपेक्षाच नाही त्याला मुळात मुलगाच म्हणू नये.

आज हवेत काय मिसळलं होतं कोण जाणे ? राळ की विष ?  गुदमरून झाल्यावर मुलाने आजोबांच्या फोटो कडे पहिलं आणि वडिलांनी रांगणाऱ्या नातवाकडे. दोघांच्याही  मनात काय काय चालू असेल?

मर्यादांच्या भिंती जेव्हा प्रत्येक झन सांभाळतो तेव्हा त्या भिंतींना घर म्हणता येतं. जीथे एकीकडे सुसाट सुटलेली जीभ आणि दुसरीकडे फक्त प्रारब्धावर विश्वास ठेऊन सय्यमचं पांघरून ओढणारे असे दोन भाग पडतात तिथे कुटुंब संपतं.
समुद्राला भरती ओहोटी येते इतका फरक कुणाच्या असण्या नसण्यान पडतो आणि काहीही अपेक्षा नसल्या तर ते बोलून दाखवण्याची गरजच पडत नाही.  पुढला विचार ह्या कथेच्या साराचा  - प्रत्येकानं वेळेत स्वतःच श्रद्ध उरकावं.

उर्वरित गोष्टीचं पुढे काय ?
काही नाही - प्रत्येक बाप एकदा मुलगा असतो आणि प्रत्येक मुलगा एकदा बाप होतो ह्या चक्रात कोणाकडे कुठले पत्ते येणार आणि कोणाच्या तोंडी कोणती वाक्य असणार हे परत अखेरचा स्वास घेणाऱ्या श्रीकृष्णावर सोडावं आणखी काय.


No comments:

Post a Comment

बापा साठी