तो एका मोठ्या खडकावर उभा आहे. खालच्या झोपड्पट्टीतुन वर बघितल्यास उंच डोंगरावरच्या त्या खडकावर त्याची फक्त देहाकृती दिसते. मुसळधार पाउसाआधीच ते आभाळ विक्राळ वाटू लागलं आहे चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात हलणारे ढग वेगाने जमा होत आहे. त्याचा शर्ट वाऱ्यावर फडफडत आहे. उपनगराजवळच्या ह्या उंच टेकडीवर तो पहिल्यांदाच आला. पण ह्या प्रवासाच्या थरारक आठवणी आयुष्यभर आठवण राहील अश्या होत्या.
त्याने खाली बघितलं डोंगर पोखरून छोटा होत चाललंय, एका बाजूने मल्टिन्याशनल कंपनीची काचेची आणि काँक्रिटची चाल आणि दुसऱ्या बाजून जंगली वेलीं सारखी अवाढव्य वाढलेली झोपडपट्टी ह्यात हिरवा दिसणारा हा डोंगर ढासळत कधीही खाली कोसळनार असा झालाय. पण उंचावरून सगळंच वेगळं दिसतं. अचानक अंतर्रचक्षु उघडल्या सारखा तो बघू लागला. तो गडबडीत पुढे जाणाऱ्या गर्दीकडे बघू लागला, पावसाळयाच्या चिखलात अळ्या वळवळल्या सारखा तो जथ्था सरकतो आहे. अचानक त्याला घरची आठवण आली. मग एक एक नातं त्यानं फायलींवर घेतलं प्रत्येकाचे आपले आपले स्वार्थ प्रत्येकाच्या त्याच्याकडून अपेक्षा हे त्याच्या डोळ्या समोर फिरू लागलं. पैसा असला की सगळं किती सुखकर असते. फॉरेन ट्रिप ते चॉकलेट केक किती गोष्टी ह्व्या. आपल्या माणसांना आपलीच भाषा का कळत नाही ? कर्तव्य करा अपेक्षा करू नका !
हे सगळं एका एकी जाणवत न्हवत खरंतर. वीस दिवसांची रजा मंजूर करून घेतली. ऑफिस फाईल क्युबिकल सगळ्यांचा खूप कंटाळा त्याला आला होता. बाहेर गावी जाण्यासाठी सगळी जमवाजमव करणे कठीण होत, हॉटेल बुकिंग, रेल्वे रिझर्वेशन हे ही वेळेवर अश्यक्य. त्यामुळे सुट्टी काढून फजिती झाली. पावसामुळे नजर कैद झाल्यासारखी परिस्थिती झाली. घरचा स्टुपिड बॉक्स सुरु झाला , मालिका, जाहिराती, बातम्या, खाना खजाना , ट्रॅव्हल चॅनेल, शिवाय नॅशनल जिओग्राफिक ह्या सगळ्यांचा ही कंटाळा आला.
घरच्याच्या आपसात होणाऱ्या गप्पाकडे जरा जास्ती लक्ष देण्यात आलं, लोक मालिकां बद्दल बोलतात, फोन वरून येणाऱ्या गमती जमती एकमेकांना ऐकवतात आणि आपण किती सहज सरळ आहोत हे एकमेकांना भासवतात. मालिकेतल्या घटनांवरून घरी वाद घालतात, स्त्रिया त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार बद्दल बोलतात , पुरुष दरवेळी स्त्रीयनमुळे छळला जातो हे सगळं बोललं जातं, शाळेची मुलं अभ्यासापेक्षा प्रेम प्रकरणांवर बोलतात आणि म्हातारे अध्यत्मा पेक्षा धार्मिक रुढींवर. मित्रांचंही तेच पास आऊट होत पर्यंत सगळे फक्त मित्र असतात पाच वर्षांनी प्रत्येकाजवळ स्टेटस असतं. नवीन फोन , गाडी , प्रॉपर्टी आणि हेच सगळं प्रोग्रेस डिस्कस करतात. हे असो शेवटी उरलेल्या सुट्ट्यांमध्ये काय करावं हा प्रश्न उरलाच.
अचानक सगळे उपद्रवी मित्र आठवले, हा ग्रुप जरा वेगळा होता, दारू आणि भटकणे हे मूळ काम, त्यातही काही मित्र फुकट करमणूक करून घेणारेच होते. त्यामुळे त्यांच्या सोबत एक फेरफटका मारणे हा मस्त प्लॅन जमला. एकाने दारू स्पॉन्सर केली ती घेऊन सगळ्यांनी पावसात डोंगरावर भटकण्यासाठी हे सगळे निघाले.
खूप गप्पा झाल्या टिंगल करून झाली, सगळ्या घाण शिव्या वगरे ओरडून एकमेकांना दिल्या घसा मोकळा झाला, बिनधास्त पणे मोकळ्या हवेत मुतून झालं त्यामुळे आनंदात भर पडली, एकानेही पैश्यांच्या गोष्टी केल्या नाही, राजकारण तर दूरच, एकमेकांच्या बायको बद्दल हि ते बोलले नाही, सेक्स सिक्रेट ही शेअर केली नाही.
छान वाटत होत ह्याची तुलना कश्याशी करावं ? ह्रिदयनाथांचं गाणं म्हणू याला कि जगजीत कि गझल! वा! मज्जा!
मज्जा खूप झाली चढलेल्यांना चढली आणि ज्यांना चढली नाही ते डोंगरावर अजून पुढे गेले वर चढत राहिले आणि पाऊस सुरु झाला. इट्स जस्ट ड्रिसलिंग असं म्हणत ते चालत राहिले.
तो एकटाच मागे राहिला मात्र थोड्याच वेळात पावसाने आणि गडगडाटाने घाबरून ग्रुप पळून गेला , तो मात्र त्या उंच दगडावर उभा राहिला, दारू चढली की उतरली ह्या संभ्रमापलीकडे कुठल्याही वादळाला आपण तोंड देऊ शकतो वगरे भ्रामक कल्पना गळून पडल्या. हे सगळं, आपण स्वतः, आपलं आयुष्य, आपले जीवना बद्दलचे समज गैरसमज किती निरर्थक आहे हे समजल्या सारखं मन हवेत उडू लागलं. सगळ्यात महत्वाचं ह्या जाणीव आता का होत आहे हे त्याला कळेना?
प्लास्टिक बंदी झाली पण सगळी कडे प्लास्टिक अजूनही तुंबले आहे, आणि आपण स्वतः किती प्लास्टिक बनलो? कृत्रिम म्हणा, यांत्रिक म्हणा, किंवा प्लास्टिक म्हणा शेवटी अर्थ एकच. ही नेमकी तीच वेळ ज्यावेळी तो त्या खडकावर चढलेला सगळ्यांना दिसला, आयुष्यचा चित्रपट त्याच्या डोळ्या समोर सुरु होता.
तो पुढे काय करणार? आत्महत्या ? त्याला ह्या सगळ्या गीष्टींमुळे विरक्ती येणार? हे सगळे दुरुन ह्या माणसाकडे बघणार्याचे निष्कर्ष.
पण त्याने परत ऑफिस जॉईन करायचं ठरवलं. भानावर येताच त्याने डोंगरा खाली उतरून आपण घरी जावं असा विचार केला. यंत्राचा घाणांना स्पस्ट ऐकू येत होता. तो पुढे पुढे चालत होता तेव्हड्यात एका मोठ्या खड्यात पडण्या आधी त्याने आपला तोल सांभाळला .
खाली एक मोठी मगर होती , त्याला आश्चर्य वाटलं, इथे ही एव्हडी मोठी मगर कशी काय आली? डोळे विस्फारून परत तिच्या कडे तो निरखून बघू लागला पावसाचा जोर वाढत होता एक वीज चमकली , त्या प्रकाशात मगरीचे सगळं शरीर चमकलं सायन्स फिक्शन फिल्म मध्ये दाखवता तशी ती मेटलची एक यांत्रिक मगर होती. मगरीनेही आ वासून त्याच स्वागत केलं. तो त्या भल्या मोठ्या गढ्या मध्ये नाहीसा झाला.
उडी मारन्या आगोदर त्यांनी आपली त्वचा काढून ठेवली, मात्र सुसाईड नोट वगरे काही नाही पोलिसांनी सांगितलं. पंचनाम्यानंतर पोलिसांनी त्याची प्लास्टिकची त्वचा त्याच्या घरी परत केली. त्याच्या प्लास्टिक च्या त्वचेवर ऑफिशिअल बार कॉड तपासण्यात आला, सगळे शिक्के ही बघितले ठरविक जात, धर्म, पक्ष, आदर्शवाद हे सगळे स्टॅम्प अगदी बरोबर होते, त्यावरून ही त्याचीच त्वचा होती. सगळ्याची घोर निराशा झाली जाण्याआधी प्लांनिंग केलं असतं चार पॉलिसी काढल्या असत्या. स्पा मध्ये जाऊन आपली त्वचा जरा नीट नेटकी केली असती नवीन टॅटू काढून घेतले असते, आता हि सर्वसामान्य त्वचा काय करणार त्याच्या मुलांनाही अशी ओल्ड फ्याशन त्वचा विकून काय मिळणार, एक मोठा प्रॉब्लेम होता ते थेट कपाळावर सयंमी आणि प्रामाणिक हे वॉटरमार्क होते ते जिवंत असतांना भासले नाहीच. जिद्द नाही महत्वाकांक्षा नाही चातुर्य हि नाही हे कसलेच लेबल त्याच्या त्वचेवर नव्हते. त्याच्या रेनकोट च्या बाजूला घरच्यांनी ही त्वचा लटकावून ठेवली. कोणी तरी शोकसभेत सांगितलं बदलत्या जगात प्लास्टिकनेस झुगारून अमरत्व प्राप्त केलं ह्या माणसाने. त्याच्या फोटोवर एक प्लास्टिकचाच हार चढवला आहे. बिनधास्त मित्रांचा ग्रुप त्याच्या नावानं त्याच डोंगरावर जाऊन दारू पिण्याचं प्लॅनिंग करत आहे.

No comments:
Post a Comment