Wednesday, June 13, 2018

गोंदण

एका कानात वेगळं व दुसऱ्या कानात वेगळं असे आवाज आपल्याला सहसा ऐकू येत नाही. काही विशेष तंत्रज्ञान वापरून काही संगीतकारानी प्रयोग केले ही.
दोन आवाज ऐकू येण्याचा हा त्याचा पहिला प्रसंग होता असे नाही. एक आतला आवाज आणि दुसरा इतरांचे आवाज ही विभागणीही त्यांना माहित होती . पण असे दोन आवाज?  हे फार विचित्र होतं आणि विचित्र घडल्याने विचलित न होता आश्चर्यानं आनंदी होणं हाच त्याचा स्वभाव एरवी झाला होता. मग ते बोलू लागले, सभोतालची माणसं त्याच्या कडे काही विशिष्ट्य नजरेनं बघत होती काही हळूच हसु दाबून परत पूर्ववत होत होती. त्या सगळ्यांची त्यांना गम्मत वाटली. ते बोलत राहिले फार प्रकर्षाने त्यांना  हे जाणवत होतं की जसे मला दोन आवाज येत आहे तसच मी बोललेलं कुणीच ऐकू शकत नाही.
आधी लहान मुलांच्या कविता गुंनगूनन झालं मग मनाचे श्लोक आणि मग एक कामुक गीत ते आनंदानं म्हणू लागले. जेव्हा हे ठाम कळलं की खरंच आपण बोललेलं इतरांना ऐकू जात नाही तेव्हा तर त्याने कहरच केला दोन सणसणीत शिव्या भो पासून भ्या पर्यन्त आणि कमरे खालून आत पर्यंत दिल्या तेव्हा एक स्त्री तिथून उठून गेली त्यांनी हळूच बाजूच्याला विचारलं मी बोलतोय ते तुम्हाला ऐकू तर येत नाही ना?, तो म्हणाला अहो काही नाही कुठे काय तुम्ही काही म्हणालात का?
मग त्यांनी विचारलं मी दिसतोय तुम्हाला ? तो म्हणाला नाही कुठे आहेत तुम्ही ? अस्स!  त्यांनी शर्ट काढला बर  मग सांग माझ्या छातीवर काय लिहिलं आहे तो म्हणाला तुमच्या छातीवर लिहिलं नाही हो चित्र काढलं आहे आहे कमळाचं, काय मस्त टॅटू आहे!. ते दचकून म्हणाले, काय म्हणता ? म्हणजे मी तुम्हाला दिसतोय तर आणि  ऐकू ही येतोय बापरे ! असं म्हणत त्यांनी शर्ट घातला व शांत बसले. आता तर ते हाथही  हलवत नव्हते ना बोटांवर काही मोजत होते.
ते विचार करू लागले संभोगा नंतरही लगेच कपडे घालणारा मी एवढ्या लोकांसमोर उघडा कसा झालो. ही माझी प्रेत अवस्था का झाली. त्यांनी खिश्यातुन रुमाल काढला आणि चेहरा पुसला मग ते शेजारी बसलेल्या, समोर बसलेल्या लोकांकडे बघू लागले आणि आत आत विरघळत गेले. घामानं चेहरा शिळ्या सफरचंदावर पाणी शिकपडेल्या  सारखा झाला, थोडा वेळ गेला. ते जरा शांत झाले.
बाजूच्या तरुणाने विचारलं  काय झालं काका तुम्हाला ?  अहो घाबरू नका तुमच्या छातीवर कमळ नाही पंजा गोंदवलाय. त्यांनी संपूर्ण कपडे काढले आणि म्हणाले ह्याचा अर्थ मी मेलोय!,  भूत झालोय!,  मुळात मी इतका नगण्य आहे कि मी कोणालाच दिसत नाही आणि ऐकूही येत नाही आणि ज्यांना वाटत की तुम्ही मला असं नागाव बघू शकता त्यांनी हे समजून घ्यावं की ते ही भूतच आहेत, मेलेलेच आहेत.     

No comments:

Post a Comment

बापा साठी