Thursday, June 21, 2018

गुपित

"लग्नाची पहिली रात्र"  दोघांनाही ह्या विषयाने ग्रासलं होतं. जेव्हडे आतुर आपण होतो तेव्हडीच भीतीही  वाटते.  सर्व सोपस्कार संपले आणि त्याने दार बंद केलं. चित्रपटात दाखवतात तस काही नाही साधी सरळ स्वछ खोली आणि उशीच्या दोन्ही बाजूला गुलाबाच्या कळ्यांचा गुच्छ. बेडरूम मध्ये सुघंधही छान पसरला होता. त्यांनी जवळ बसून हातात हात घेतले. अश्या पहिल्या रात्री भीतीच्या वाटाव्या असं बरच बोलणं होतं. लोक पहिलं प्रेम कोण होत इथं पासून ते आजून काय सांगतील, काय बोलतील काय नेम. प्रेम विवाह असला तरी आज ची रात्र स्मरणात रहावी असं काही करावं अश्या ही गोष्टींचं दडपण असतंच.
ह्या रात्री जोडपी शपथाही फार घेतात आणि वचनंही दिली जातात.  मग शरीर आणि आत्म्याचं मिलन वगरे वगरे वगरे.

बऱ्याच ठिकाणी घरची मंडळी किंवा मित्र परिवार काही उचापती करतात. एका जोडप्याच्या बेडरूम मध्ये प्रेत्येक तासाला गजर वाजेल अशी बरीच घड्याळ लपूउन ठेवली होती किंवा कुठल्याश्या कोपऱ्यात बेडूक असलेला डबा लपवलेल्या गमती मित्र परिवारांनी सांगितल्या होत्या.  विशेष टीप-  कुठलं विड्याचं खावं, दुधात काय मिसळावं, ते कॉन्डोम कोणत्या फ्लेव्हर चा वापरावा कित्ती गुपितं पाळली जातात. तशीच मुलींचीही गुपितं असतात. विशेष म्हणजे आपण लाजायचं की नवीन काही उलगडायचं ? हे दोघांच्याही मनात सुरूच असत.

त्याने दिवे विझवले तो हळूच तिच्या जवळ बसला. ती म्हणाली अंधार नको. त्याने दिवे पुन्हा लावले. आता कुठला अंधार दूर होऊन कुठला प्रकाश पडणार ह्याची एक विचित्र कळ मेंदूत उडाली.  पूर्वी आणि एकविसाव्या शतकात माणसांच्या लैंगिक गुपितांचे  आणि आकर्षणाचे पेटारे फार बदलले आहे. शिवाय बिहार मध्ये एका नवऱ्याने आपली बायको मुलगी नाहीच हे कळल्यावर घरच्यांची डोकी फोडली ही  बातमी गर्रकन त्याच्या डोळ्या समोर आली.  आता ही काय बोलते ह्याची वाट तो बघू लागला आणि तो काय बोलेल ह्याची वाट ती बघू लागली. तिच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला काही सांगायचं असेल तर सांग मोकळी हो. आई ची आठवण येतेय का? तिने डोळे वटारले मग तो शांत राहिला आता  ती काय बोलनार म्हणून त्याने कान टवकारले.
एक विचारू तुम्हाला सगळ्यात जास्ती काय आवडत ? क्रिकेट ? तो म्हणाला नाही मला कुस्ती. आणि तुला ?
ती - रसगुल्ला.
तो - खेळ ?
ती - लगोरी, तूला खायला काय आवडतं ?
तो - पण हे सगळं आपलं बोलून झालाय , नाहीका ? हेच काय परत काही तरी वेगळं विचार ना.
ती -  जून महिन्याला अजून सात महिने बाकी आहे नाहीका ?
(तो छातीवर हात ठेवत खालीच बसला.)
ती -अहो काय झालं ?
तो -  "सात महिने?" तो  तिच्या चेहऱ्याकडे डोळे फाडून बघू लागला.
ती - अहो तस नाही, मला पावसाळा आवडतो.  तुम्ही काय विचार करताय? डेली सोप फार बघता का?
तो  -  हो कधी कधी बघतो, जेवतांना आई बघते म्हणून, पण ह्या सात महिन्यांबद्दल परत कधी बोलू नकोस.
ती - मग लाईट बंदच करा.


  

No comments:

Post a Comment

बापा साठी