कॉलेज मध्ये असितांना कनिकाची कट्टर फेमिनिस्ट अशी ओळख होती. कुठल्याही स्त्री वर अन्याय होतांना बघितला की मागचा पुढचा विचार न करता ती कुणाशीही दोन हात करायला तयार असायची. अश्या कडक स्वभावामुळे एक नुकसान नक्की झालेलं. पुरुष मंडळी जरा दूरच राहिली. नवरा ही फार विचारपूर्वकआणि तिच्या मर्जीने वागणारा होता. समानतेच्या या युगात सभ्य आणि आदर्श वागणूक करणारा नवरा तिला जास्तीच सन्मानानं वागवायचा.
नुकतेच एका कामासाठी ती मुंबई ते गुजरात मग राजस्थान मध्ये भटकून आली. परतीच्या प्रवासात कुणी तरी सहज सुचवलं म्ह्णून ती अभयारण्याच्या हद्दीला अगदी लागून असलेल्या रिसॉर्ट मध्ये थांबलेली. सकाळी सहाला इतक्या थंडीत ती रोजची सवय न मोडता फेऱ्या मारायला बाहेर पडली ते तिच्या लक्षयात आलं कि शेजारी एक अस्तबल आहे, ती तिथे गेली, अंगावरची शॉल छान गुंडाळली होती आणि तिचे केस वाऱ्यावर उडत होते.
सकाळचं कोव्हळ उन्ह आणि इकडे तिकडे फिरणारे ते घोडे तिला फार आवडले. तेव्हड्यात एका बाईने आवाज दिला " जास्त जवळ जाऊ नका म्याडम. ती साफसफाई करत होती , एका बाजूला बांधलेल्या म्हशींना ती चारा घालत होती. स्वभाव नुसार तिथे जाऊन कनिका तिची विचारपूस करू लागली. तिचा नवरा हि आजूबाजूला काम करत होता त्याने घोडसवारी साठी एका पांढऱ्या शुभ्र घोडीला तय्यार केलेलं होतं तिला घेऊन राऊंड मारण्यापूर्वी त्याने कनिका ला विचारलं म्याडम एक राऊंड ? कणिक आधी नकोच म्हणाली पण इतकं सुंदर जनावर ते तिचा मोह काही आवरला नाही ती म्हणाली चालेल. एका चबुऱ्यावरून ती अगदी सहज घोडीवर बसली. आधी तिने घोडीच्या मानेवर पाठीवर थोपटलं पण का कुणास ठाऊक ती घोडी फेर फाटक्याच्या मूड मध्ये नव्हती. कनिका घोडे वाल्याला म्हणाली सगळं ठीक आहे ना? ही पाडणार नाही ना? घोडेवाला म्हणाला बस काय म्याडम मी आहेना, तुम्हाला काय पडू देणार तुम्ही बसा. अहो लहानपणा पासून घोड्यांच्यातच वावरलोय सगळ्या मस्तवानं लोकांना मी वठणीवर आणतो असं म्हणत त्याने हातातला चाबूक हवेतल्या हवेत जोऱ्यात फिरवला त्याचा एक विशेष भीतीदायक आवाज झाला. घोडीने मात्र आपली असंमती दाखवली ती पुढे येईना दोन चार चाबूक फिरवूनही जेव्हा ती तय्यार होत नाही कनिका म्हणाली असुद्या मी उतरते. अन्याय बघू शकणे कनिकाला शक्य नव्हतं. ती घोडीवरून उतरली तर तो घोडेवाला स्वतःच फेरफटका मारायला निघून गेला. चाबकाच्या चार फटक्याने जनावर सुसाट पळत होतं.
कनिका साफसफाईत गुंग असलेल्या त्या बाईला कडे बघत म्हणाली काय माणूस आहे हा ? दयामाया काही नाही ? ती म्हणाली म्याडम फार मजेदार माणूस आहे तो, त्याला दुसऱ्याला मनवताबी येतं आणि आवरता बी येतं. मग गालातल्या गालात हसून म्हणाली माझा नवरा आहे. क्षणात विचार आला हा माणूस घोड्यांशी असा वागतो तर बायकोला काय त्रास देत असेल ?
कनिकान खोदून खोदून विचारपूस केली, हा तुला त्रास देतो का , छळ वगरे करतो का ?
बाईनं कणिकाच्या डोळ्यात बघितलं म्हणाली हे बघा म्याडम एक तर पुरुषाची जात वर घोड्यांना काबूत ठेवतो मग मी काय आहे. तुमचं लग्न झालंय ना मंगळसूत्र आहे गळ्यात वर तुम्ही पुरुषांबद्दल काय विचारता ?
कनिका शांतच राहिली मग म्हणाली अग पण बळजबरी वगरे नाही ना करत ? बाई जरा जवळ आली आणि कणिकाच्या खाद्यवर हात ठेवत म्हणाली तो लहान पणा पासून घोड्यांच्यात वाढलाय त्या मुळे बाईशी बळजबरी करतो पण हवी हवीशी वाटणारी. कणिकाच्या डोळ्यात क्षण भर बघत ती वेड्या सारखी हसली.
त्यांच्या गप्पा रंगल्या. तासाभराने परत जाण्या आधी तिने कनिकाला गरम दूध प्यायला दिलं.
दिवसभर फेरफटका झाला संध्याकाळी कनिका परत मागच्या ग्राउंड वर गेली घोड्यांना बघितलं.
संध्याकाळी दुसरा एक राखाडी रंगाचा घोडा तिला सावरी करायला मिळाला. तिने घोडेवाल्याच्या मदतीने सेल्फीही काढला. इतर पर्यटक जात पर्यंत ती त्याच आवारात फिरत होती. हा माणूस काय ऐटीत घोड्यावर चढतो इतरांना कस बसावं हे शिकवतो, चांगली सैर झाली कि घोड्यांच्या पाठीवर थाप देऊन शाब्बासकी देतो, त्या पांढऱ्या घोडीची तर विशेष निगा घेतो तिला किती प्रेमाने कुरवाळतो, आणि एखादा अडेल टट्टु असेल तर लगेच एक हंटर फिरवून देतो. तिचं फिरत फिरता हे बारीक निरीक्षण सुरूच होतं. रिसॉटवर परत येतांना मागच्या बाजूने आऊट हाऊस कडून कनिका वळली. दोन घोड्यांना आज एका मोठया रीगणात मोकळं सोडलं होतं, ती जोडी असावी असा अंदाज कनिकाने लावला.
रात्र चांदण्यानी भरलेली होती, हातात कंदील घेऊन उभी असलेली घोडेवाल्याची बायको तिला परत दिसली.
कनिकाने फक्त हात दाखवला, ती कनिकाला घेऊन त्यांच्या घरात आली. कनिका त्यांचं घर निरखून बघू लागली, घरातल्या प्रत्येक वस्तू विशेष होत्या, त्या भागातल्या संस्कृतीला शोभणाऱ्या, सजावट नसली तरी ते घर छान लावलं होतं आणि स्वछ होतं. थन्डीची छान तयारी केलीत तुम्ही कणिक म्हणाली. एका मोठया घमेल्यात जाळ आणि खाली जाडजूड बिछाना लावला होता. अस्तबलाला लागून खोल्या असल्या तरी तिथे दुर्घन्धी नव्हती. दारात रातराणीच झाड होत. जंगलातून मधेच मोराचे आवाज येत होते. अश्या जंगलाच्या बाजूने दूरवर वस्ती नव्हती, शहरा सारखा गोंगाट नव्हताच शिवाय शहरी पणाचे सभ्य असभ्य असे पापुद्रे नव्हते. त्या जंगलाने वेढलेल्या मैदानातून आकाश किती वेगळं दिसत होतं. शांत आणि गूढ रात्रीं त्या घराच्या अंगणात दुरून शेकोटीचा जाळ दिसत होता अगदी पहाटे पर्यत.
दुसऱ्या दिवशी सकाळी कनिकाने चेक आऊट केलं चाव्या परत केल्या. कनिका निघून गेल्यावर म्यानेजर ने बुकात नोंद केली त्याच्या लक्ष्यात आलं काल रात्री कनिका रिसॉर्ट मध्ये परतलीच नव्हती.
No comments:
Post a Comment