Saturday, April 27, 2019

एका पुंडलिकाची दुसरी गोष्ट

" कल, आज और कल"
सिनेमा छान आहे हे मला आता ह्या साठी सांगावं वाटतंय कारण काही प्रश्न आणि त्यांची उत्तर सुचत आहे.
खरं तर सारखे प्रश्न पडणाऱ्या माणसाला उत्तरं ही सुचतात हा एक वेगळाच विनोद आहे.

पुंडलिकाला विठ्ठलानं लाथाडावं असं विपरीत घडतं का ?
हे तर स्वतःला पुंडलिक मानणारा आणि तो कुणाला पांडुरंग मानतो ह्यावर अवलंबून आहे.
(ह्या बद्दल दोन्ही पक्ष्याची लायकी काय ? हा निर्णय घ्यायला कोणी तिसरा हवा आहे का ?)

 एकदा स्पस्ट बोलणाऱ्या बापानं बोलून दाखवलं " आम्हाला काही फरक पडत नाही,  आमच्या मुलाकडून काही अपेक्षा नाही." मग मुलगा विचार करू लागला आपल्याला वडिलांना मुखाग्नी देण्याचा तरी हक्क मिळेल का ? आईवडिलांची सेवा करण्याचा मोह ज्याने जन्मभर पाळला त्याने ह्या टोकाचा विचार करावा?  का?
नवस बोलून झाल्येल्या मुलाबद्दल, स्वतः चांगले संस्कार करून वाढवलेल्या मुलाबद्दल बापाने हे बोलावं?  का ?

गोष्ट रामाची की दुर्योधनाची ? जमदग्नीची की  शाहजहाँची ? गोष्ट एकविसाव्या शतकातली की पिढ्यान पिढ्यांची?
 काळ, स्थान आणि व्यक्ती निश्चित झाले की गोष्टीला हवा तसा आकार देता येतो हे प्रत्येक वाचकाला माहिती असतंच.

समीकरण स्पष्ट आहेत.  १) ह्या बदलत्या युगात मुलं आईवडिलांकडे दुर्लक्ष करतातच.
२) ज्या मुलांकडून अपेक्षा नाही तो कर्तव्य पार पाडण्यात कमी पडला थोडक्यात आपली लायकी सिद्ध करू  शकला नाही.
३) एका शब्दात - प्रारब्ध ( प्रत्येकाचं )

मग वेगवेगळ्या दृष्टीकोनाने वडील आणि मुलगा बिन काचेच्या चष्म्यातून एकमेकांकडे बघू लागले.
दुर्दैव हें उत्तरं दोघांकडेही राखून ठेवलं होतच. काच नसली तरी विचारांची फ्रेम असतेच, नाही का?

मुलाने वारंवार विचार केला आपण कुठे चुकलो?
वडिलांनी जाहीर केल, परत परत " आम्हाला काही फरक पडत नाही, आमच्या मुलाकडून काही अपेक्षा नाही."
मुलगा विचार करू लागला आपल्या ह्या भिकार कथेचा आणि कृष्णाच्या मृत्यूच्या कथेत साम्य शोधता येईल का?
वडिलांनी बहुदा औरंगजेबाची प्रतिमा उभी केली असावी.
स्वतः श्रीकृष्णाला गांधारीच्या शापाचा तोडगा काढता आला नाही की ते तसच घडावं हे त्याने ठरवलं होतं ?

आपल्या कथेत " हे असच होणार"  हे आधीच कुणी ठरवून ठेवलं आहे का ?
परत दोघांनी विचार केला,  आपली विवंचना आपण कशी मांडावी ? हे जे शिक्के-ठसे आपल्या कपाळावर उमटवले हे कसे दूर करावे.
प्रार्थना करून,  द्यावया करून?  आकांत तांडव करून की आत्महत्या करून हा पहिला विचार.
आपण स्वतःच दूर व्हायचं आणि समोरच्याची वाक्य खरी होण्यास मद्त करावी हा दुसरा विचार.
( "तू म्हणतो तसंच घडो असं वास्तुदेवता म्हणत असतो" हे आजीने सांगितलेला आठवलं )

परत ते वाक्य खोली भर पसरलं  " आम्हाला काही फरक पडत नाही, आमच्या मुलाकडून काही अपेक्षा नाही."
त्या वाक्याचं प्रतिउत्तरही  मागो माग फिरत होतं - मग ज्याने फरक पडत नाही किंवा ज्याच्या कडून अपेक्षाच नाही त्याला मुळात मुलगाच म्हणू नये.

आज हवेत काय मिसळलं होतं कोण जाणे ? राळ की विष ?  गुदमरून झाल्यावर मुलाने आजोबांच्या फोटो कडे पहिलं आणि वडिलांनी रांगणाऱ्या नातवाकडे. दोघांच्याही  मनात काय काय चालू असेल?

मर्यादांच्या भिंती जेव्हा प्रत्येक झन सांभाळतो तेव्हा त्या भिंतींना घर म्हणता येतं. जीथे एकीकडे सुसाट सुटलेली जीभ आणि दुसरीकडे फक्त प्रारब्धावर विश्वास ठेऊन सय्यमचं पांघरून ओढणारे असे दोन भाग पडतात तिथे कुटुंब संपतं.
समुद्राला भरती ओहोटी येते इतका फरक कुणाच्या असण्या नसण्यान पडतो आणि काहीही अपेक्षा नसल्या तर ते बोलून दाखवण्याची गरजच पडत नाही.  पुढला विचार ह्या कथेच्या साराचा  - प्रत्येकानं वेळेत स्वतःच श्रद्ध उरकावं.

उर्वरित गोष्टीचं पुढे काय ?
काही नाही - प्रत्येक बाप एकदा मुलगा असतो आणि प्रत्येक मुलगा एकदा बाप होतो ह्या चक्रात कोणाकडे कुठले पत्ते येणार आणि कोणाच्या तोंडी कोणती वाक्य असणार हे परत अखेरचा स्वास घेणाऱ्या श्रीकृष्णावर सोडावं आणखी काय.


Friday, July 6, 2018

प्लास्टिक बंदी

तो एका मोठ्या खडकावर उभा आहे.  खालच्या झोपड्पट्टीतुन वर बघितल्यास उंच डोंगरावरच्या त्या खडकावर त्याची फक्त देहाकृती दिसते. मुसळधार पाउसाआधीच ते आभाळ विक्राळ वाटू लागलं आहे चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात हलणारे ढग वेगाने जमा होत आहे. त्याचा शर्ट वाऱ्यावर फडफडत आहे. उपनगराजवळच्या ह्या उंच टेकडीवर तो पहिल्यांदाच आला. पण ह्या प्रवासाच्या थरारक आठवणी आयुष्यभर आठवण राहील अश्या होत्या.
त्याने खाली बघितलं डोंगर पोखरून छोटा होत चाललंय, एका बाजूने मल्टिन्याशनल कंपनीची काचेची आणि काँक्रिटची चाल आणि दुसऱ्या बाजून जंगली वेलीं सारखी अवाढव्य वाढलेली झोपडपट्टी ह्यात हिरवा दिसणारा हा डोंगर ढासळत कधीही खाली कोसळनार असा झालाय.  पण उंचावरून सगळंच वेगळं दिसतं.  अचानक अंतर्रचक्षु उघडल्या सारखा तो बघू लागला. तो  गडबडीत पुढे जाणाऱ्या  गर्दीकडे बघू लागला, पावसाळयाच्या चिखलात अळ्या वळवळल्या सारखा तो जथ्था सरकतो आहे.  अचानक त्याला घरची आठवण आली. मग एक एक नातं त्यानं फायलींवर घेतलं प्रत्येकाचे आपले आपले स्वार्थ प्रत्येकाच्या त्याच्याकडून अपेक्षा हे त्याच्या डोळ्या समोर फिरू लागलं. पैसा असला की सगळं किती सुखकर असते. फॉरेन ट्रिप ते चॉकलेट केक किती गोष्टी ह्व्या. आपल्या माणसांना आपलीच भाषा का कळत नाही ? कर्तव्य करा अपेक्षा करू नका !
हे सगळं एका एकी जाणवत न्हवत खरंतर.  वीस दिवसांची रजा मंजूर करून घेतली.  ऑफिस फाईल क्युबिकल   सगळ्यांचा खूप कंटाळा त्याला आला होता. बाहेर गावी जाण्यासाठी सगळी जमवाजमव करणे कठीण होत, हॉटेल बुकिंग, रेल्वे रिझर्वेशन हे ही  वेळेवर अश्यक्य. त्यामुळे सुट्टी काढून फजिती झाली.  पावसामुळे नजर कैद झाल्यासारखी परिस्थिती झाली.  घरचा स्टुपिड बॉक्स सुरु झाला , मालिका, जाहिराती, बातम्या, खाना खजाना , ट्रॅव्हल चॅनेल, शिवाय नॅशनल जिओग्राफिक ह्या सगळ्यांचा ही  कंटाळा आला.
घरच्याच्या आपसात होणाऱ्या गप्पाकडे जरा जास्ती लक्ष देण्यात आलं, लोक मालिकां बद्दल बोलतात, फोन वरून येणाऱ्या गमती जमती एकमेकांना ऐकवतात आणि आपण किती सहज सरळ आहोत हे एकमेकांना भासवतात.  मालिकेतल्या घटनांवरून घरी वाद घालतात, स्त्रिया त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार बद्दल बोलतात , पुरुष दरवेळी स्त्रीयनमुळे छळला जातो हे सगळं बोललं जातं, शाळेची मुलं अभ्यासापेक्षा प्रेम प्रकरणांवर बोलतात आणि म्हातारे अध्यत्मा पेक्षा धार्मिक रुढींवर. मित्रांचंही तेच पास आऊट होत पर्यंत सगळे फक्त मित्र असतात पाच वर्षांनी प्रत्येकाजवळ स्टेटस असतं. नवीन फोन , गाडी , प्रॉपर्टी आणि हेच सगळं प्रोग्रेस डिस्कस करतात. हे असो शेवटी उरलेल्या सुट्ट्यांमध्ये काय करावं हा प्रश्न उरलाच.
अचानक सगळे उपद्रवी मित्र आठवले, हा ग्रुप जरा वेगळा होता, दारू आणि भटकणे  हे मूळ काम, त्यातही काही मित्र फुकट करमणूक करून घेणारेच होते. त्यामुळे त्यांच्या सोबत एक फेरफटका मारणे हा मस्त प्लॅन जमला. एकाने दारू स्पॉन्सर केली ती घेऊन सगळ्यांनी पावसात डोंगरावर भटकण्यासाठी हे सगळे निघाले.
खूप गप्पा झाल्या टिंगल करून झाली, सगळ्या घाण शिव्या वगरे ओरडून एकमेकांना दिल्या घसा मोकळा झाला, बिनधास्त पणे मोकळ्या हवेत मुतून झालं त्यामुळे आनंदात भर पडली, एकानेही पैश्यांच्या गोष्टी केल्या नाही, राजकारण तर दूरच, एकमेकांच्या बायको बद्दल हि ते बोलले नाही, सेक्स सिक्रेट ही शेअर केली नाही.
छान वाटत होत ह्याची तुलना कश्याशी करावं ? ह्रिदयनाथांचं गाणं म्हणू याला कि जगजीत कि गझल! वा! मज्जा!
मज्जा खूप झाली चढलेल्यांना चढली आणि ज्यांना चढली नाही ते डोंगरावर अजून पुढे गेले वर चढत राहिले आणि पाऊस सुरु झाला. इट्स जस्ट ड्रिसलिंग असं म्हणत ते चालत राहिले. 

तो एकटाच मागे राहिला मात्र थोड्याच वेळात  पावसाने आणि गडगडाटाने घाबरून ग्रुप पळून गेला , तो मात्र त्या उंच दगडावर उभा राहिला, दारू चढली की उतरली ह्या संभ्रमापलीकडे कुठल्याही वादळाला आपण तोंड देऊ शकतो वगरे भ्रामक कल्पना गळून पडल्या. हे सगळं, आपण स्वतः, आपलं आयुष्य, आपले जीवना बद्दलचे समज गैरसमज किती निरर्थक आहे हे समजल्या सारखं मन हवेत उडू लागलं. सगळ्यात महत्वाचं ह्या जाणीव आता का होत आहे हे त्याला कळेना?

प्लास्टिक बंदी झाली पण सगळी कडे प्लास्टिक अजूनही तुंबले आहे, आणि आपण स्वतः किती प्लास्टिक बनलो?  कृत्रिम म्हणा, यांत्रिक म्हणा, किंवा प्लास्टिक म्हणा शेवटी अर्थ एकच. ही  नेमकी तीच वेळ ज्यावेळी तो त्या खडकावर चढलेला सगळ्यांना दिसला, आयुष्यचा चित्रपट त्याच्या डोळ्या समोर सुरु होता.

तो पुढे काय करणार? आत्महत्या ? त्याला ह्या सगळ्या गीष्टींमुळे विरक्ती येणार? हे सगळे दुरुन ह्या माणसाकडे बघणार्याचे निष्कर्ष.

पण त्याने परत ऑफिस जॉईन करायचं ठरवलं. भानावर येताच त्याने डोंगरा खाली उतरून आपण घरी जावं असा विचार केला. यंत्राचा घाणांना स्पस्ट ऐकू येत होता. तो पुढे पुढे चालत होता तेव्हड्यात एका मोठ्या खड्यात पडण्या आधी त्याने आपला तोल सांभाळला .
खाली एक मोठी मगर होती , त्याला आश्चर्य वाटलं, इथे ही एव्हडी मोठी मगर कशी काय आली?  डोळे विस्फारून परत तिच्या कडे तो निरखून बघू लागला पावसाचा जोर वाढत होता एक वीज चमकली , त्या प्रकाशात मगरीचे सगळं शरीर चमकलं सायन्स फिक्शन फिल्म मध्ये दाखवता तशी ती मेटलची एक यांत्रिक मगर होती. मगरीनेही आ वासून त्याच स्वागत केलं. तो त्या भल्या मोठ्या गढ्या मध्ये नाहीसा झाला.


उडी मारन्या आगोदर त्यांनी आपली त्वचा काढून ठेवली, मात्र सुसाईड नोट वगरे काही नाही पोलिसांनी सांगितलं. पंचनाम्यानंतर पोलिसांनी त्याची प्लास्टिकची त्वचा त्याच्या घरी परत केली.  त्याच्या प्लास्टिक च्या त्वचेवर ऑफिशिअल बार कॉड तपासण्यात आला, सगळे शिक्के ही बघितले ठरविक जात, धर्म, पक्ष, आदर्शवाद हे सगळे स्टॅम्प अगदी बरोबर होते, त्यावरून ही त्याचीच त्वचा होती. सगळ्याची घोर निराशा झाली जाण्याआधी प्लांनिंग केलं असतं चार पॉलिसी काढल्या असत्या. स्पा मध्ये जाऊन आपली त्वचा जरा नीट नेटकी केली असती नवीन टॅटू काढून घेतले असते, आता हि सर्वसामान्य त्वचा काय करणार त्याच्या मुलांनाही अशी  ओल्ड फ्याशन त्वचा विकून काय मिळणार, एक मोठा प्रॉब्लेम होता ते थेट कपाळावर सयंमी आणि प्रामाणिक हे वॉटरमार्क होते ते जिवंत असतांना भासले नाहीच. जिद्द नाही महत्वाकांक्षा नाही चातुर्य हि नाही हे कसलेच लेबल त्याच्या त्वचेवर नव्हते. त्याच्या रेनकोट च्या बाजूला घरच्यांनी ही त्वचा लटकावून ठेवली.  कोणी तरी शोकसभेत सांगितलं बदलत्या जगात प्लास्टिकनेस झुगारून अमरत्व प्राप्त केलं ह्या माणसाने.  त्याच्या फोटोवर एक प्लास्टिकचाच हार चढवला आहे.  बिनधास्त मित्रांचा ग्रुप त्याच्या नावानं त्याच डोंगरावर जाऊन दारू पिण्याचं प्लॅनिंग करत आहे.


Tuesday, June 26, 2018

जाहिरात आणि मालिका

आयुष्यात एकदा तरी असं  होतं , तुम्ही चौदा चे असा, चाळिशीचे असा व अगदी साठी उलटलेली असली तरीही तुम्ही एखाद्या अश्या व्यक्ती समोर येता कि तिच्या डोळ्यांमध्ये बघताच न शमणारी ज्वाळा तुमच्या आत पेट घेते. 
ह्या सगळ्यात अस्वस्थ आणि दुःखी करणारी बाब ही  कि ती व्यक्ती ज्यांच्या सहवासात आपण जगतो, वावरतो  त्यांच्या पैकी ती नसते. 
न शमणारी ज्वाळा वगरे वाचायला जरा जड वाटत असलं तरी सुलभाला त्याचा अर्थ कळत होता. तिच्या नवऱ्याने त्याच्या वोर्कस्पेस समोर एक नवीन प्रिंट आऊट लावलं . हे नवीन नव्हतं कारण मोटिवेशन साठी काही तरी मजकूर तो सॉफ्टबॉर्ड वर लावायचाच. तो जाहिराती साठी जिंगल लिहायचा.  विशेष म्हणजे त्याने ह्या वेळी जे प्रिंट आऊट लावलं होता त्या वर लिहिला होतं " I fall in love again"  आता मराठी मालिका बघणारी बाई तिच्या डोक्यात काय काय चक्र चालतील? ते सुरु झाले. 

परिस्थिती हाता  बाहेर जाऊ नये म्हणून सुलभा स्वतः ची विशेष काळजी घ्यायला लागली, नीट नेटकी रहायला लागली. तो बाहेरून घरी आला की आपण फ्रेश दिसतोय ना ह्यावर ती लक्ष देऊ लागली. अगदी जाहिरातीतल्या नटी सारखी. 
स्वयंपाक घरापासून ते बेडरूम पर्यंत घरातल्या प्रत्येक प्रॉडक्ट वर जाहिरातींचा प्रभाव जाणवू लागला होता. सकाळची किशोर स्पेशल गाणी ती रेडिओवर ऐकायची तेव्हा जाहिरात लागली कि  आवाज मोठा करायची आणि टीव्ही वर तर मालिका सुरु होताच दुसऱ्या चॅनलवर  नवीन जाहिराती  बघण्या साठी ती चॅनल चेंज करायची. 

चहा बदलला, आंघोळीचं साबण बदललं, डोक्याला लावायचं तेल बदललं, खिडक्यांचे पडदे बदलले. आणि रात्री चे नाईटगाऊनही.  पण ह्या माणसात काही बदल जाणवत नव्हता आणि घरात काही बदल होत आहे हे त्याच्या लक्ष्यात येऊ नये व त्यावर बोलू नये इतका कामात गुंगही नव्हता, बर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं  हे असच आहे असं सुलभाला वाटत होतं. जाहिरातीच्या वेळी टीव्ही चा आवाज बंद करनाऱ्या घरात हे काय घडत होतं  


तिने सहज नवऱ्याला विचारलं तुम्ही जाहिरातीं साठी कस काय लिहिता , म्हणजे सुचत कस ? तो म्हणाला काही सगळं खोटं बोलायचं , सोपं आहे टूथपेस्ट बदलले कि प्रमोशन आणि अंडरवेअर बदलली कि नवी गर्ल फ्रेंड. 
तिने नाक मुरडत दुर्लक्ष केलं. 
आता त्याच लक्ष आपल्याकडे नाहीच हे सुलभाच्या लक्ष्यात येताच तिने घरी बोलणं कमी केलं, पण मेकअप नाही. तोही गप्प गप्प राहू लागला.  मुळात पूर्ण बोलणं बंद होण्यापूर्वी काय तो सोक्ष मोक्ष लावावा असं सुलभाने ठरवलं. 

आज रविवार आणि सकाळी कॉफी घेतांना तो "आप कि अदालत" बघणार हे नक्की होते. सुलभाने हळूच केबल ची वायर काढून ठेवली आणि दहाच्या ठोक्याला ती ही कॉफि घेत त्याच सोफ्यावर बसली. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. नवऱ्याने विचारलं काय झालं ?  सुलभ म्हणाली - काढून टाकलाय. मग त्याने विचारलं मग मी घरात रहायचं ना? का असा का विचारता ? तो म्हणाला आता मंगळसूत्र काढून टाकलाय म्हणजे ? 
ती गप्पच राहिली तिला आठवलं रात्री सोन्याचा तार टोचल्यानं तीन मंगळसूत्र काढून ठेवलं होतं. 
ती उठायला गेली तर नवरा म्हणाला बस सांग तरी कोण आहे तो ? 
ती म्हणाली आधी तुम्ही सांगा ना ! नवरा म्हणाला मला काही अंदाज नाही तुझा कोणी जुना मित्र वगरे आहेका ?
सुलभा चिडलीच म्हणाली अरे काय माणूस आहे,  स्वतःच पितळ झाकायला माझ्यावर काय संशय घेतोय ? 

नवरा शांत राहिला, काहीच बोलला नाही, घर ह्या अबोल्या सप्तहात हळवं झालं. त्यात कोळ्याने कोपऱ्या  कोपऱ्यावर चार दोन जाळी विणली. दिवसा ढगाळ वातावरण असल्यानं घरात स्वछ प्रकाशही आला नाही. 
कधी नव्हे ती बाल्कनीत उभी राहिली. खाली झोपडपट्टी, तिथे नवरा बायकोची भांडण, त्याचा आवाज नेहमीच यायचा. त्यांच्या भांडणातून आपण प्रोत्साहन मिळवावं असं वाटलं, या उलट इथे आज सगळं शांत. उलट एका खिडकीतून तिला नको तो प्रकार दिसला. ती चिडली हि आणि लाजही वाटली. ह्या  लोकांना काही काळ  नाही  ती जरा  मोठ्याने बड्बडली. काय झालं ग ? नवऱ्याने विचारलं 
सुलभाचं लक्ष परत सॉफ्टबॉर्ड वर गेलं तिच्या नवऱ्याने नवीन प्रिंट आऊट लावलं होतं. 

"If forever really exits, I will really like to spend it with you" 

नवऱ्याने परत विचारलं काय झालं ? सुलभ म्हणाली काही नाही माझ्या मालिकेची वेळ झालीय जरा टीव्हीचा केबल लावून द्या.  

Saturday, June 23, 2018

अस्तबल

 कॉलेज मध्ये असितांना कनिकाची कट्टर फेमिनिस्ट अशी ओळख होती. कुठल्याही स्त्री वर अन्याय होतांना बघितला की  मागचा पुढचा विचार न करता ती कुणाशीही दोन हात करायला तयार असायची. अश्या कडक स्वभावामुळे एक नुकसान नक्की झालेलं. पुरुष मंडळी जरा दूरच राहिली.  नवरा ही फार विचारपूर्वकआणि तिच्या मर्जीने वागणारा होता. समानतेच्या या युगात सभ्य आणि आदर्श वागणूक करणारा नवरा तिला जास्तीच सन्मानानं वागवायचा. 
नुकतेच एका कामासाठी ती मुंबई ते गुजरात मग राजस्थान मध्ये भटकून आली. परतीच्या प्रवासात कुणी तरी सहज सुचवलं म्ह्णून ती अभयारण्याच्या हद्दीला अगदी लागून असलेल्या रिसॉर्ट मध्ये थांबलेली.  सकाळी सहाला इतक्या थंडीत ती रोजची सवय न मोडता फेऱ्या मारायला बाहेर पडली ते तिच्या लक्षयात आलं कि शेजारी एक अस्तबल आहे, ती तिथे गेली, अंगावरची शॉल छान गुंडाळली होती आणि तिचे केस वाऱ्यावर उडत होते. 
सकाळचं कोव्हळ उन्ह आणि इकडे तिकडे फिरणारे ते घोडे तिला फार आवडले. तेव्हड्यात एका बाईने आवाज दिला " जास्त जवळ जाऊ नका म्याडम. ती साफसफाई करत होती , एका बाजूला बांधलेल्या म्हशींना ती चारा   घालत होती. स्वभाव नुसार तिथे जाऊन कनिका तिची विचारपूस करू लागली. तिचा नवरा हि आजूबाजूला काम करत होता त्याने घोडसवारी साठी एका पांढऱ्या शुभ्र घोडीला तय्यार केलेलं होतं तिला घेऊन राऊंड मारण्यापूर्वी त्याने कनिका ला विचारलं म्याडम एक राऊंड ? कणिक आधी नकोच  म्हणाली पण इतकं सुंदर जनावर ते तिचा मोह काही आवरला नाही ती म्हणाली चालेल. एका चबुऱ्यावरून ती अगदी सहज घोडीवर बसली. आधी तिने घोडीच्या मानेवर पाठीवर थोपटलं पण का कुणास ठाऊक ती घोडी फेर फाटक्याच्या मूड मध्ये नव्हती. कनिका घोडे वाल्याला म्हणाली सगळं ठीक आहे ना?  ही  पाडणार नाही ना?  घोडेवाला म्हणाला बस काय म्याडम मी आहेना, तुम्हाला काय पडू देणार तुम्ही बसा. अहो लहानपणा पासून घोड्यांच्यातच वावरलोय सगळ्या मस्तवानं लोकांना मी वठणीवर आणतो असं म्हणत त्याने हातातला चाबूक हवेतल्या  हवेत जोऱ्यात फिरवला त्याचा एक विशेष भीतीदायक आवाज झाला. घोडीने मात्र आपली असंमती दाखवली ती पुढे येईना दोन चार चाबूक फिरवूनही जेव्हा ती तय्यार होत नाही कनिका म्हणाली असुद्या मी उतरते. अन्याय बघू शकणे कनिकाला शक्य नव्हतं. ती घोडीवरून उतरली तर तो घोडेवाला स्वतःच फेरफटका मारायला निघून गेला. चाबकाच्या चार फटक्याने जनावर सुसाट पळत होतं. 

कनिका साफसफाईत गुंग असलेल्या त्या बाईला कडे बघत म्हणाली काय माणूस आहे हा ? दयामाया काही नाही ? ती म्हणाली म्याडम फार मजेदार माणूस आहे तो, त्याला दुसऱ्याला मनवताबी येतं आणि आवरता बी येतं. मग गालातल्या गालात हसून म्हणाली माझा नवरा आहे. क्षणात विचार आला हा माणूस घोड्यांशी असा वागतो तर बायकोला काय त्रास देत असेल ?
कनिकान खोदून खोदून  विचारपूस केली, हा तुला त्रास देतो का , छळ वगरे करतो का ? 
बाईनं कणिकाच्या डोळ्यात बघितलं म्हणाली हे बघा म्याडम एक तर पुरुषाची जात वर घोड्यांना काबूत ठेवतो मग मी काय आहे. तुमचं लग्न झालंय ना मंगळसूत्र आहे गळ्यात वर तुम्ही पुरुषांबद्दल काय विचारता ? 
कनिका शांतच राहिली मग म्हणाली अग पण बळजबरी वगरे नाही ना करत ? बाई जरा जवळ आली आणि कणिकाच्या खाद्यवर हात ठेवत म्हणाली तो लहान पणा पासून घोड्यांच्यात वाढलाय त्या मुळे बाईशी बळजबरी करतो पण हवी हवीशी वाटणारी.  कणिकाच्या डोळ्यात क्षण भर बघत ती वेड्या सारखी हसली. 
त्यांच्या गप्पा रंगल्या. तासाभराने परत जाण्या आधी तिने कनिकाला गरम दूध प्यायला दिलं. 
दिवसभर फेरफटका झाला संध्याकाळी कनिका परत मागच्या ग्राउंड वर गेली घोड्यांना बघितलं. 

संध्याकाळी दुसरा एक राखाडी रंगाचा घोडा तिला सावरी करायला मिळाला. तिने घोडेवाल्याच्या मदतीने सेल्फीही काढला. इतर पर्यटक जात पर्यंत ती त्याच आवारात फिरत होती. हा माणूस काय ऐटीत घोड्यावर चढतो इतरांना कस बसावं हे शिकवतो, चांगली सैर झाली कि घोड्यांच्या पाठीवर थाप देऊन शाब्बासकी देतो, त्या पांढऱ्या घोडीची तर विशेष निगा घेतो तिला किती प्रेमाने कुरवाळतो, आणि एखादा अडेल टट्टु असेल तर लगेच एक हंटर फिरवून देतो. तिचं फिरत फिरता हे बारीक निरीक्षण सुरूच होतं. रिसॉटवर परत येतांना मागच्या बाजूने आऊट हाऊस कडून कनिका वळली.  दोन घोड्यांना आज एका मोठया रीगणात मोकळं सोडलं होतं, ती जोडी असावी असा अंदाज कनिकाने लावला. 
रात्र चांदण्यानी भरलेली होती, हातात कंदील घेऊन उभी असलेली घोडेवाल्याची बायको तिला परत दिसली. 
कनिकाने फक्त हात दाखवला, ती कनिकाला घेऊन त्यांच्या घरात आली. कनिका त्यांचं घर निरखून बघू लागली, घरातल्या प्रत्येक वस्तू विशेष होत्या, त्या भागातल्या संस्कृतीला शोभणाऱ्या, सजावट नसली तरी ते घर छान लावलं होतं आणि स्वछ होतं. थन्डीची छान तयारी केलीत तुम्ही कणिक म्हणाली. एका मोठया घमेल्यात जाळ आणि खाली जाडजूड बिछाना लावला होता. अस्तबलाला लागून खोल्या असल्या तरी तिथे दुर्घन्धी नव्हती. दारात रातराणीच झाड होत. जंगलातून मधेच मोराचे आवाज येत होते. अश्या जंगलाच्या बाजूने दूरवर वस्ती नव्हती, शहरा सारखा गोंगाट नव्हताच शिवाय शहरी पणाचे सभ्य असभ्य असे पापुद्रे नव्हते. त्या जंगलाने वेढलेल्या मैदानातून आकाश किती वेगळं दिसत होतं. शांत आणि गूढ रात्रीं त्या घराच्या अंगणात दुरून शेकोटीचा जाळ दिसत होता अगदी पहाटे पर्यत.  
दुसऱ्या दिवशी सकाळी कनिकाने चेक आऊट केलं चाव्या परत केल्या. कनिका निघून गेल्यावर म्यानेजर ने बुकात नोंद केली त्याच्या लक्ष्यात आलं काल रात्री कनिका रिसॉर्ट मध्ये परतलीच नव्हती. 


Thursday, June 21, 2018

गुपित

"लग्नाची पहिली रात्र"  दोघांनाही ह्या विषयाने ग्रासलं होतं. जेव्हडे आतुर आपण होतो तेव्हडीच भीतीही  वाटते.  सर्व सोपस्कार संपले आणि त्याने दार बंद केलं. चित्रपटात दाखवतात तस काही नाही साधी सरळ स्वछ खोली आणि उशीच्या दोन्ही बाजूला गुलाबाच्या कळ्यांचा गुच्छ. बेडरूम मध्ये सुघंधही छान पसरला होता. त्यांनी जवळ बसून हातात हात घेतले. अश्या पहिल्या रात्री भीतीच्या वाटाव्या असं बरच बोलणं होतं. लोक पहिलं प्रेम कोण होत इथं पासून ते आजून काय सांगतील, काय बोलतील काय नेम. प्रेम विवाह असला तरी आज ची रात्र स्मरणात रहावी असं काही करावं अश्या ही गोष्टींचं दडपण असतंच.
ह्या रात्री जोडपी शपथाही फार घेतात आणि वचनंही दिली जातात.  मग शरीर आणि आत्म्याचं मिलन वगरे वगरे वगरे.

बऱ्याच ठिकाणी घरची मंडळी किंवा मित्र परिवार काही उचापती करतात. एका जोडप्याच्या बेडरूम मध्ये प्रेत्येक तासाला गजर वाजेल अशी बरीच घड्याळ लपूउन ठेवली होती किंवा कुठल्याश्या कोपऱ्यात बेडूक असलेला डबा लपवलेल्या गमती मित्र परिवारांनी सांगितल्या होत्या.  विशेष टीप-  कुठलं विड्याचं खावं, दुधात काय मिसळावं, ते कॉन्डोम कोणत्या फ्लेव्हर चा वापरावा कित्ती गुपितं पाळली जातात. तशीच मुलींचीही गुपितं असतात. विशेष म्हणजे आपण लाजायचं की नवीन काही उलगडायचं ? हे दोघांच्याही मनात सुरूच असत.

त्याने दिवे विझवले तो हळूच तिच्या जवळ बसला. ती म्हणाली अंधार नको. त्याने दिवे पुन्हा लावले. आता कुठला अंधार दूर होऊन कुठला प्रकाश पडणार ह्याची एक विचित्र कळ मेंदूत उडाली.  पूर्वी आणि एकविसाव्या शतकात माणसांच्या लैंगिक गुपितांचे  आणि आकर्षणाचे पेटारे फार बदलले आहे. शिवाय बिहार मध्ये एका नवऱ्याने आपली बायको मुलगी नाहीच हे कळल्यावर घरच्यांची डोकी फोडली ही  बातमी गर्रकन त्याच्या डोळ्या समोर आली.  आता ही काय बोलते ह्याची वाट तो बघू लागला आणि तो काय बोलेल ह्याची वाट ती बघू लागली. तिच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला काही सांगायचं असेल तर सांग मोकळी हो. आई ची आठवण येतेय का? तिने डोळे वटारले मग तो शांत राहिला आता  ती काय बोलनार म्हणून त्याने कान टवकारले.
एक विचारू तुम्हाला सगळ्यात जास्ती काय आवडत ? क्रिकेट ? तो म्हणाला नाही मला कुस्ती. आणि तुला ?
ती - रसगुल्ला.
तो - खेळ ?
ती - लगोरी, तूला खायला काय आवडतं ?
तो - पण हे सगळं आपलं बोलून झालाय , नाहीका ? हेच काय परत काही तरी वेगळं विचार ना.
ती -  जून महिन्याला अजून सात महिने बाकी आहे नाहीका ?
(तो छातीवर हात ठेवत खालीच बसला.)
ती -अहो काय झालं ?
तो -  "सात महिने?" तो  तिच्या चेहऱ्याकडे डोळे फाडून बघू लागला.
ती - अहो तस नाही, मला पावसाळा आवडतो.  तुम्ही काय विचार करताय? डेली सोप फार बघता का?
तो  -  हो कधी कधी बघतो, जेवतांना आई बघते म्हणून, पण ह्या सात महिन्यांबद्दल परत कधी बोलू नकोस.
ती - मग लाईट बंदच करा.


  

Monday, June 18, 2018

पेंटिंग स्टुडिओ आणि काळ मांजर

स्टुडिओत एकच गोंधळ माजलेला रात्रीचे एक वाजलेले माझ्या मांडीवर मोठी जखम झालेली त्यातून रक्त वहायला लागलं. मी शेवटी शांत बसलो. मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ताबडतोब मिळाल्यामुळे फार निवांत वाटू लागलं.
एक छोटं पांढर शुभ्र मांजराचं पिल्लू मी पाळलेल होतं आणि नेमकं त्याच आई सोबत हिंडणार काळ पिल्लू स्टुडिओतल्या भांड्यातून दूध प्यायचं माश्यांचे तुकडे पळवायचे वर मी पाळलेल्या पिल्लाच्या अंगावर धावून जायचं, ओरबाडायचं.
अमु प्रिंटिंग स्टुडिओच काम आटोपून निघून गेला, मी वॉटर कलरचा एक वॉश दिला आणि बाहेर च्या शेड मध्ये बसलेलो. तेव्हड्यात तेच काळ मांजराचं पिल्लू तिथे आलं आणि चुपचाप बसलेल्या पांढऱ्या मांजरावर धावून गेलं, आधी आवाज करत त्याला दूर केल, पण परत जेव्हा ते बशीतला वाट घ्यायला आलं अचानक मी एक लाकडी ठोकळा त्याच्या दिशेनं फेकला नेम धरून मारल्या सारखा तो त्या पिल्लाच्या पोटावर बसला. ते पिल्लू धाडकन पडलं मिर्गी आल्या सारखं कापू लागलं. त्याच थरथरणारं शरीर शांत होत गेलं, मी घाबरलो उगाच एवढ्याश्या पिल्लाचा जीव जाऊ नये म्हणून मी त्याला उचलून गोंजारलं. मांडीवर थोपडलं, थोडं पाणी पाजलं ते कित्ती वेळ हालचाल न करता पडून राहिलं.

माझ्या टेबलच्या कप्प्यात मी त्या पिल्लाला ठेवलं. थोड्या वेळाने मी पुन्हा बघितलं आता ते धिटावलं होतं. मी त्याच्या अंगावरून हाथ फिरवावा म्हणून त्याच्या जवळ गेलो त्यानं जोरात पंजांनं फटकारा मारला, धावलं आणि ते अगदी अडचणीच्या जागी जाऊन बसलं.  तिथे स्टुडिओचे बरेच सामान ठेवले होते, पैंटिंग नाईफ होते, आणि तारांचा गुंताही होता. त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पण अडगळीत ते पिल्लू अजूनच आत शिरत गेलं.

एका क्षणासाठी स्वतःच्या वागण्याची चीड आली, लाजही वाटली त्याच क्षणी असं वाटलं की हे पिल्लू आता ठीक आहे हे परत आपल्या काळ्या रंगावर जाईल, आणि पुन्हा नाही तेच प्रकार करेल. एकदा स्टुडिओत झोपलेलो तेव्हा हेच पिल्लू छातीवर बसलेलं त्याच्या गुरघुरणाऱ्या मऊ आणि छोट्या अंगानं एक विचित्र अनुभव मला दिला होता. स्वप्न बघतांना भुभुळ हलली की मांजर डोळ्यांवर पंजा मारते असे किस्से ऐकले होते. आणि इजिप्तच्या इतिहासात परलोकांशी नातं जोडण्याच्या मांजरांच्या दंतकथाही वाचल्या होत्या.

मी त्याला पकडण्याचा प्रयत्न सोडला वळलो ते मागे पुढे न बघता, त्या कचाट्यातून बाहेर येतांना एक जाड तार मांडीत घुसला प्यांट फाटली आणि मोठा चिरा पडला, रक्त वाहू लागलं. मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ताबडतोब मिळाल्यामुळे फार निवांत वाटू लागलं.

हा घडलेला प्रसंग दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्रांना ऐकवला.  कांबळे हसला त्यानं माझं शर्ट बाहेर आलेलं जानवं आत घेण्याचा इशारा केला. गप्पा रंगल्या आणि संपल्याही  कांबळे जाता जाता म्हणाला के काळ मांजरीचं पिल्लू माझी जिम्मेदारी मी त्याला स्कल्पचर डिपार्टमेंट मध्ये नेतोयं मला मांजराच्या शरीर रचनेचा अभ्यास करायचा आहे. स्केचेस करून मस्त एक क्ले मॉडेलिंग करेल त्याला रंगाचं बंधन नाही .. तो हसला निघून गेला.


बापा साठी